आचारसंहिता काळात हार्मोनि मिनरल ला मिळाले अधिकाऱ्यांचे पाठबळ?
Sangini News
वणी शहरापासून अवघ्या पाच किलोमीटर अंतरावर असलेल्या भालर येथे आधीच रॉकवेल। नावाची कंपनी आहे. यातच कंपनीने हार्मोनि मिनरल नावाचे नवीन युनिट सुरू करण्यासाठी ऐन आचारसंहिता काळात ग्रामस्थ ग्रामपंचायत ला विश्वासात न घेता अधिकाऱ्यांचे बळ वापरत प्रदूषण नियामक मंडळ, यांची ग्रामस्थ उठाव घेण्याच्या दृष्टीने प्रयत्न करत असतानाच सदर कंपनीला नाहरकत प्रमाणपत्र दिल्याचे आरोप ग्रामस्थांनी केला आहे.Did Harmoni Minerals get the support of the authorities during the code of conduct?
तालुक्यातील भालर ग्रामपंचायत कडे हार्मोनि मिनरल या कंपनीने नाहरकत प्रमाणपत्र मिळण्यासाठी अर्ज केला होता. प्रसंगी आचारसंहिता असल्याने ग्रामसभेत प्रस्ताव ठेवण्याचे ग्रामपंचायत ने संबंधितांना सांगितले होते. दरम्यान याच याच संधीचा फायदा घेत वरिष्ठ अधिकाऱ्यांनी ग्रामस्थांच्या मागणीला बाजूला करत मनमानी कारभार केला असल्याचा आरोप भालर ग्रामस्थांनी केला आहे.
प्रदूषणाच्या विळख्यात अडकणार येथील जिल्हा परिषद शाळा?
अवघ्या सातशे मीटर अंतरावर येथील जिल्हा परिषद शाळा आहे. गावातील लेकरं येथे शिक्षण घेत आहे. भविष्यात आरोग्याचा प्रश्न निर्माण होणार आहे. यासाठी वणी येथील अधिकारी व कंपनी प्रशासन जबाबदार असणार आहे.
प्रमोद दोडके
अध्यक्ष शाळा व्यवस्थापन समिती
जिल्हा परिषद शाळा भालर

%20(2).jpg)